Ferfar #8369 · चांदसर बुद्रुक
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/2
- Talathi
- संदेशकुमार अमृत आखाडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे चांदसर, ता. धरणगांव येथील गट नं. 194/1 क्षेत्र 0.72 हे. आर, आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर. आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब ची शेतजमीन असून, सदर जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करून मिळणेबाबत श्रीमती. सुमन भागवत बारी, रा. चांदसर बु. ता. धरणगांव, जि. जळगांव यांनी अर्ज सादर होता
त्यानुसार मंडळ अधिकारी, चांदसर भाग यांनी चौकशी करून दिनांक 10/10/2025 रोजी अहवाल सादर केलेला असून, सदर अहवालानुसार प्रस्तुत प्रकरणी गट नं. 194/1 क्षेत्र 0.72 हे. आर, आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर, आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब चा असल्याचे स्पष्ट होते.
त्यानुसार मुंबई हलके गाव नोकर इनाम नष्ट करणे कायदा, 1958 नुसार दिनांक 01/02/1962 पासून सर्व इनाम खालसा करण्यात आलेली असून नोंद क्र. 3375 दिनांक 07/01/66 अन्वये सदर जमीन रीग्रांट करण्यात आलेली आहे.
त्यानुसार शासन परिपत्रक क्र. वतन-1099/प्र.क्र.223/ल-4, दिनांक 9 जुलै 2002 मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-2 मधील कोळी इनाम वर्ग 6-ब जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नजराणा भरणे आवश्यक आहे. त्याअर्थी दुय्यम निबंधक, धरणगांव यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2025 नुसार गट नं. 194/1 सदर जमिनीचा शीघ्रसिद्धगणकानुसार नजराण्याचा मूल्यांकन दर रु. 504252/- ठरविण्यात आलेला आहे तसेच गट नं. 194/2 सदर जमिनीचा शीघ्रसिद्धगणकानुसार नजराण्याचा मूल्यांकन दर रु. 252126/- ठरविण्यात आलेला आहे त्याच्या 50% प्रमाणे रु. गट नं. 194/1- र.रु 252126 + गट नं. 194/2- र.रु. 126063 इतकी रक्कम नजराणा म्हणून चलन दिनांक 27/11/2025 रोजी 1. चलन क्र. MH012429104202526M /2. MH012428727202526M अन्वये भारतीय स्टेट बँक, शाखा धरणगांव येथे भरणा करण्यात आलेला आहे.
म. तहसिलदार धरणगांव या आदेशान्वये मौजे चांदसर बु., ता. धरणगांव येथील गट नं. 194/1 क्षेत्र 0. 72 हे. आर. आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर, आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब ची जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यास खालील अटी व शर्तीवर मंजुरी देण्यातआलेली आहे.
अटी व शर्ती
1. भविष्यात हक्काभिलेखासंदर्भात काही वाद उद्भवल्यास त्या वादासंबंधीची संपूर्ण जबाबदारी जमीनधारकाची राहील.
2. सदर विक्रीचा व्यवहार खालील कायद्यांच्या तरतुदींनुसार व त्यांचे अधिन राहून करण्यात यावा.
अ) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961.
ब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948.
क) मुंबईचा तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा, 1947.
ड) सदर जमिनीस लागू असलेल्या इतर सर्व प्रचलित कायद्यांतील तरतुदी.
3. प्रकरणी दिनांक 9 जुलै 2002 चे परिपत्रकात नमुद केलेप्रमाणे संपूर्ण क्षेत्राबाबत भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 करण्याबाबत तरतुद आहे. त्याअनुषंगाने अर्जदार यांना फक्त शेती उपयोगाकरिता
अर्जदार यांना परवानगी देण्यात येत आहे.
वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास / केल्यास अगर प्रस्तावातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास सदरचा आदेश आपोआप रद्द होऊन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता जमीन सरकार जमा केली जाईल. वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास किंवा प्रस्तावातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास, सदरचा आदेश आपोआप रद्द ठरेल व कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई न देता सदर जमीन शासनजमा करण्यात येईल.
सदरची नोंद म. तहसिलदार धरणगांव याचाकडील आदेशावरून केली असे.