Ferfar #5669 · शिंदी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 404/2/ब
- Talathi
- चेतन गोविंद बैरागी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुका/1 ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
फेरफार पत्रक – दुरुस्त नोंद (बोजा कमी करणे)
गाव: शिंदी, ता. भडगाव, जि. जळगाव
फेरफार प्रकार: बोजा कमी करणे (दुरुस्ती)
बोजा कमी करून देणार: श्रीमती सरलाबाई दगडू सोनार, रा. शिंदी
बोजा कमी करून घेणार: बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी, ता. भडगाव, जि. जळगाव
सर्व्हे क्रमांक: ४०४/२/ब
नोंदीचा तपशील:
श्रीमती सरलाबाई दगडू सोनार, रा. शिंदी यांच्या सर्व्हे नं. ४०४/२/ब वर बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी यांचा रु. १,६८,०००/- (अक्षरी रुपये एक लाख अठ्ठ्यांसष्ट हजार फक्त) चा, दि. १५/१०/२०२६ रोजीचा पीककर्ज इकरार बोजा फेरफार क्र. ५६५७ अन्वये नोंदविण्यात आला होता.
तांत्रिक कारणास्तव (नोटीस बजावणीसाठी नोंद उपलब्ध न होणे व नोंदीची तारीख भरता न येणे) सदरची नोंद पुन्हा घेण्यात येऊन फेरफार क्र. ५६५८ नोंदविण्यात आला. नंतर एनएलआरएमपी (NLRMP) संकेतस्थळाची अडचण दूर झाल्याने दोन्ही नोंदी उपलब्ध झाल्या. त्यामुळे एकाच बोजाच्या दोन नोंदी सातबारा उताऱ्यावर आल्या.
सदरचा बोजा एकच असल्याने, द्विरुक्ती टाळण्यासाठी फेरफार क्र. ५६५७ ची बोजा नोंद कमी करणे आवश्यक आहे. फेरफार क्र. ५६५८ ची बोजा नोंद कायम राहील.
नोंद: मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचे परिपत्रक क्र. कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९ अन्वये, तांत्रिक अडचणीमुळे झालेली दुहेरी नोंद दुरुस्त करण्यासाठी फेरफार क्र. ५६५७ अन्वये सातबारा उताऱ्यावर नोंदलेला बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी यांचा रु. १,६८,०००/- चा पीककर्ज बोजा कमी करण्यात येत आहे. फेरफार क्र. ५६५८ मधील बोजा नोंद कायम राहील.
दिनांक: ___२८/१०/२०२६
ठिकाण: शिंदी
ग्राम महसूल अधिकारी, शिंदी