सातबारा Watch

← मोथा

Ferfar #954 · मोथा

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
132/ड/4
Talathi
अनिता चिरोंजिलाल सेलेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 सक्षम अधिकारी मा जिल्हाधिकारी अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्रं./एम.आर.सी-८१/मोथा-३४ /२०२५-२६दि.१८/०६/२०२६ व मा.तहसिलदार चिखलदरा यांचे पत्र क्रं प्रस्तुत-१ /म.स./प.क्रं.१८.४.६/स. क्रं १२३६५०९/कावी-४८७ /२०२६ दि.१३/०७/२०२६ अन्वये भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने मौजा मोथा येथील सर्वे नं.१३२/ड/४ क्षेत्रफळ ०.८७ हे.आर. सदरहू जमीन खालील अटी व शर्तीच्या आधीन राहून, आदेशान्वये भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे व हस्तांतरणास बंदी -अहस्तांतरणिय नोंद कमी करून,उक्त आदेशाची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली आहे. अटी व शर्ती – १) प्रश्नाधीन जमिनीच्या भोगवटदार वर्ग -१ मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश निर्गंमित करण्यापूर्वि उपविभागीय अधिकारी धारणी यांना अन्य प्रचिलीत अधिनियम व शासनाने विहित केलेल्या तरतुदीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. २) उक्त प्रकरणी भविष्यात कोणतीही परिच्छेद उपस्थित झाल्यास अर्जदारास तफावतीची रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील. ३) सदर प्रकरणात भविष्यात मालकी हक्काबाबत/ वारसा हक्काबाबत आक्षेप दाखल झाल्यास किंवा वाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संमती पत्र दाखल करणार्याब कार्यालयाची व अर्जदाराची राहील.या कार्यालयाचा कोणताही संबंध राहणार नाही. ४) सदर मिळकतीस भोगवटदारं वर्ग -१ ची परवानगी मिळणेसाठी अर्जदार यांनी दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवली असल्यास त्यामुळे चुकीची परवानगी दिली गेल्यास अथवा कोणत्याही अधींनियमांचा, शासन निर्णय , अधिसूचना शासनाच्या प्रचलित धोरणांचा भंग होत असल्यास शासन अथवा कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी जबाबदार राहणार नाही. ५) भविष्यात शासकीय जमीन मंजूरी संदर्भात शासनाकडून प्राप्त होणारे सर्व आदेश व त्यानुसार होणारी कार्यवाही अर्जदारास बंधनकारक राहील.