Ferfar #17248 · बेला
भंडारा, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
मौजा बेला व तालुका भंडारा येथील ७/१२ उताऱ्यातील भूमापन क्रमांक ३०७ (खाते क्र. 1006159) व ३१०/६/३ (खाते क्र. 1006158) मधील सामायिक खातेदार श्री. रामदास दाजीबा महाकाळकर (रा. गुरुनानक वार्ड, शास्त्रीनगर, भंडारा) यांचा मृत्यू दिनांक २१/०१/२०२४ रोजी झालेला आहे (मृत्यू दाखला नोंदणी क्र. D-2024: 27-90074-000109, नोंदणी दिनांक २४/०१/२०२४). मयत श्री. रामदास दाजीबा महाकाळकर यांनी त्यांच्या हयातीत दिनांक २०/०८/२०२३ रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर निष्पादित केलेल्या मृत्युपत्र/इच्छापत्रामधील तरतुदीनुसार, त्यांनी आपल्या मालकीची व सामायिक हक्काची संपूर्ण मालमत्ता व सर्व अधिकार केवळ आणि केवळ त्यांची पत्नी सौ. इंदिरा रामदास महाकाळकर यांनाच प्रदान केलेले आहेत. त्याअनुषंगाने, भूमापन क्रमांक ३०७ व ३१०/६/३ वरील सामायिक खातेदारांच्या यादीतून मयत श्री. रामदास दाजीबा महाकाळकर यांचे नाव कमी करून, त्यांनी निष्पादित केलेल्या मृत्युपत्र दिनांक २०/०८/२०२३ अन्वये त्यांच्या जागी एकमेव भोगवटादार म्हणून त्यांच्या पत्नी सौ. इंदिरा रामदास महाकाळकर (रा. भंडारा) यांचे नाव प्रविष्ट करण्यासाठी ही फेरफार नोंद घेतली.