Ferfar #1401 · मोरवाही - 34
गोंदिया, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
जिल्हा : गोंदिया
तालुका : गोंदिया
मौजा : मोरवाही
खाता क्र. : 264
गट क्र. : 884, 66, 885, 886, 927
फेरफाराचा प्रकार :
दुरुस्ती फेरफार – मयत खातेदाराचे नाव वारस फेरफार न घेता नजरचुकीने कमी झाल्याबाबत.
फेरफार मजकूर :
मौजा मोरवाही, ता. गोंदिया, जि. गोंदिया येथील खाता क्र. 264 मधील गट क्र. 884, 66, 885, 886 व 927 या जमिनींच्या अभिलेखात खातेदार श्रीमती उर्मिला जगन्नाथ फुंडे यांचे नाव नोंदविलेले होते.
सदर खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद घेण्यासाठी वारस फेरफार घेणे आवश्यक असताना, नजरचुकीने वारस फेरफार न घेता मयत खातेदार श्रीमती उर्मिला जगन्नाथ फुंडे यांचे नाव कमी करण्याचा फेरफार घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे सदर पूर्वीच्या फेरफाराची दुरुस्ती करून, मयत खातेदाराचे नाव कमी केल्याची नोंद दुरुस्त करण्यात यावी व त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद घेण्यासाठी नियमानुसार पुढील वारस फेरफार घेण्यात यावा.
सदर दुरुस्ती फेरफार मंजूर करण्यासाठी सादर.