Ferfar #791 · पोखर्णी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/06/2026गणेश गोविंदराव केशटवार व लक्ष्मीकांत गोविंदराव केशटवार रा. नांदेड, यांनी अर्ज दिला की कै. गोविंदराव नरहरराव केशटवार हे 16/06/2021 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.03/03/2017 रोजी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्रामध्ये आपल्या मालकीच्या व नावे असलेल्या मौ. पोखर्णी येथील मिळकती गट क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर. व गट क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.34 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. ही मालमत्ता आपली मुले यांना खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.
गणेश गोविंदराव केशटवार यांना वरील अचल संपत्ती पैकी 50% व लक्ष्मीकांत गोविंदराव केशटवार वरील अचल संपत्ती पैकी 50% याप्रमाणे हस्तांतरीत करणेबाबत नमूद केले आहे.
दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 1075 दिनांक 03/03/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.