सातबारा Watch

← जामवाडी

Ferfar #2253 · जामवाडी

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
21, 55
Talathi
कृष्‍णा दत्‍ता मुजगुले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 जामवाडी या गावातील भूमापन / गट क्रमांक २१ मधील खाते क्रमांक १८४९ वर खातेदाराचे नाव अधिकृतपणे शाम एकनाथराव बडदे असे अचूक नोंद आहे। परंतु, याच गावातील भूमापन / गट क्रमांक ५५ (खाते क्र. ४०७) तसेच इतर संबंधित गटांमधील अधिकार अभिलेख (गाव नमुना ७/१२ व गाव नमुना ८-अ) वर सदर खातेदाराचे नाव नजरचुकीने / टंकलेखन दोषाने शाम एकनाथ बडदे असे नोंद झाले आहे। खातेदार यांनी गट क्र. २१ मधील अभिलेखाच्या आधारे इतर सर्व गटांवर एकसारखे अधिकृत नाव दुरुस्त करून मिळण्याबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. त्यावरून अभिलेखाची खात्री केली असता दोन्ही नोंदी एकाच इसमाच्या असल्याचे निष्पन्न होत असल्याने, गट क्र. २१ च्या आधारे इतर गटांतील ७/१२ व ८-अ वरून कमी नाव: शाम एकनाथ बडदे दाखल नाव: शाम एकनाथराव बडदे असे दुरुस्त करून अधिकार अभिलेखात अचूक नाव नोंदविण्यास ही फेरफार नोंद केली असे.