सातबारा Watch

← कुरण

Ferfar #2130 · कुरण

अबंड, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
विश्वास भगवान ढवळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अंबड यांच्या कडील आदेश जा.क्र.२०२६/गौ.ख/कुरण ग.न. ०१/कावी-३२७, दिनांक २८/०९/२०२६ अन्वये: मौजे कुरण येथील गट क्र. ०१ मधील जमिनीवर ५० ब्रास वाळूचा अनधिकृत व बेकायदेशीर साठा केल्याचे सिद्ध झाल्याने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) मधील तरतुदीनुसार कसुरदार श्री. विष्णू बप्पाजी राक्षे, रा. कुरण, ता. अंबड यांच्यावर रु. १३,६२,५००/- (अक्षरी रुपये तेरा लाख बासष्ठ हजार पाचशे फक्त) इतका दंडात्मक महसूल आकारण्यात आलेला आहे. सदर दंडाची रक्कम विहित मुदतीत शासकीय कोषागारात जमा न केल्यामुळे, मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार मौजे कुरण येथील गट क्र. ०१ मधील श्री. विष्णू बप्पाजी राक्षे यांच्या धारण क्षेत्रावर / ७-१२ पत्रकाच्या इतर हक्कात "तहसीलदार अंबड यांच्या आदेशान्वये रु. १३,६२,५००/- शासकीय येणे (दंडाचा बोजा)" अशी नोंद घेण्यात येत आहे.