सातबारा Watch

← मंठा

Ferfar #6520 · मंठा

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 निम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत . निम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा खालील प्रमाणे निष्कर्ष आहे .कारण , मतीन हमीद शेख यांनी दस्त क्रमांक 562 /2001 ( दिनांक 27.04 .2001 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2384 /1 ज्याचे एकूण क्षेत्र 100 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .00 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट नंदकुमार बालासाहेब बत्तीसे ( आता मयत ) यांचेकडून रुपये 5 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे . उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस असे विद्यमान वारसदार यांचे सामाईक क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त जमीनधारक सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस यांचे विद्यमान सामायिक क्षेत्र नोंदीतून , खरेदीखताप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – ई फेरफार मोडूल मध्ये – लिहुन देणार:- कौशल्‍या नंदकुमार बत्‍तीसे ,जीवन नंदकुमार बत्‍तीसे ,मनीषा मनोज फर्नाडीस ,संगीता नंदकुमार बत्‍तीसे ,सतीश नंदकुमार बत्‍तीसे ,सीमा नंदकुमार बत्‍तीसे ,स्मिता मिलिंद वेगस - - -रा. मंठा(खाता क्रमांक289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मतीन हमीद शेख , (खाता क्रमांक :-5841)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 562 दिनांक 27/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला . उपरोक्त फेरफार नोंद – 1] महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 अथवा महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) यास , 2] महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे ) नियम ,2026 [ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांक 04 मे 2026 ] यास , 3] महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनींचे सक्षम प्राधिका-याच्या पूर्वपरवानगीशिवाय एकापेक्षा जास्त वेळा हस्तांतरण झाल्याने , झालेला शर्थभंग नियामुकुल करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत , मा. महाराष्ट्र शासन (महसूल व वन विभाग ) शासन परिपत्रक क्रमांक :- सिलिंग- 2026 /प्र.क्र. 70 /ल 7 दिनांक 13 जुलै 2026 यास , 4] महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपील यास , आणि 5 ] मा. तहसील कार्यालय मंठा येथे ग्राम महसूल अधिकारी मंठा यांनी गट क्रमांक 34 मधील शर्थभंग बाबत दाखल प्रस्ताव दिनांक 18.05.26 तथा , मा. तहसील कार्यालय मंठा येथे ग्राम महसूल अधिकारी मंठा यांनी , मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश जा.क्र. 2026 / उपविअ /जमा /कावि 2078 च्या संदर्भाने , विना परवानगी वर्ग 2 चे वर्ग 1 झालेल्या प्रकरणात वर्ग 2 ची दुरुस्ती अथवा पूर्ववत करणेची कार्यवाही तत्काळ करणेबाबत , असा विषयांकित केलेला सादर अहवाल दिनांक 27.10 .26 यातील निर्णयास अधीन राहील अशी फेरफार नोंद घेण्यात आली .