Ferfar #1704 · भडजी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- उज्वला अभिमन्यु वाघमारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-187
आदेश दिनांक : 15/06/2026
मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र. २०२६/मशाका/जमाबंदी-२ कावी-187 दिनांक १५.०६.२०२६ अन्वये मौजे भडजी येथील गट नं. ७० मधील जमीन धारक श्री. अण्णासाहेब किसन आधाने यांच्या नावे असलेल्या पोटखराब क्षेत्राची दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे
सदर आदेश व त्यासोबत जोडलेल्या प्रपत्र-ब नुसार गट नं. ७० मधील क्षेत्राची वस्तुस्थिती व आकारणी खालीलप्रमाणे दुरुस्त करून नोंद घेण्यात यावी:
१. सद्यस्थितीनुसार नोंद जुनी:
• एकूण लागवडीखालील क्षेत्र: २.५३ हे.आर.
• पोटखराब क्षेत्र वर्ग अ: ०.२१ हे.आर.
• जुना आकार: रु. ६.४०
२. आदेशानुसार झालेली दुरुस्ती नवीन:
• धारकाने लागवडीखाली आणलेले पोटखराब क्षेत्र: ०.२१ हे.आर.
• दुरुस्तीनंतर नवीन लागवडीखालील क्षेत्र: २.७४ हे.आर.
• दुरुस्तीनंतर शिल्लक पोटखराब क्षेत्र: ०.०० हे.आर.
• नवीन सुधारित आकार: रु. ६.९५
तरी मा. उपविभागीय अधिकारी, कन्नड यांच्या आदेशानुसार गट नं. ७० च्या ७/१२ उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र शून्य ०.०० करून ते सर्व क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र म्हणून नोंदवून सुधारित आकाराची नोंद घेण्यात येत आहे