Ferfar #2787 · नागापुर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/3/1/3
- Talathi
- दत्तात्रय गंगाधर वाघ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि-1360/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
आदेशावरून :- अर्जदार श्रीम. अंजुमखान अहमदखान पठाण रा.नांदगाव जि.नाशिक यांनी मा. तहसीलदार नांदगाव यांचे कार्यालयात दिनांक 28/09/2026 रोजी अर्ज सादर करून मौजे नागापूर, तालुका नांदगाव येथील गट नं. 17/3/1/3 या मिळकतीच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कामध्ये असलेल्या दोन नोंदी कमी करण्याबाबत विनंती केली होती .सदर अर्जातील बाबींची कागदपत्रांच्या आधारे अवलोकन व तपासणी केली असता खालीलप्रमाणे स्थिती स्पष्ट होतेः
१. पहिला विषय (सहकारी सोसायटीचा बोजा कमी करणेबाबत): मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कामध्ये "बोजा सहकारी इकरार नागापूर वि.का.सो.डी.र.रु. 10,00,00/- दिनांक 29/06/2010 बाळू सयाजी पवार करिता" असा शेरा नोंदवला आहे. अर्जातील तपशिलानुसार, सदर कर्जाची रक्कम 24/08/2026 रोजी पूर्ण भरण्यात आलेली आहे. त्यानुसार नागांपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडने यासंदर्भात कर्ज परतफेड व एनओसी (NOC) दाखला दिलेला असून, त्यानुसार सदरहू बोजा कमी करण्यास हरकत नाही.
२. दुसरा विषय (भाडेपट्ट्याची नोंद कमी करणेबाबत): 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कामध्ये "बाळू सयाजी पवार यांनी सुरज संजय पवार यांना रक्कम रु. 3,34,650/- घेऊन क्षेत्र 0.40 दिनांक 01/04/2023 पासून कालावधी वर्ष 1 महिने 0 साठी भाड्याने दिले" अशी नोंद आहे.
सदर भाडेपट्ट्याचा कालावधी संपलेला असून तो नोंदणीकृत नसल्यामुळे आणि अर्जदाराच्या मागणीनुसार सदरची नोंद कमी करणे आवश्यक ठरते.
त्यांनुसार सदर प्रकरर्णी सर्व कागदपत्रे पाहुन व अवलोकन केले असता,मा.तहसिलदार नांदगांव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम ३,५,६, व ७ नुसार आदेश क्रमांक आरटीएस/कावि-1360/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये मौजे नागापूर बेथील गट नं. 17/3/1/3 या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कात नमूद असलेला "बोजा सहकारी इकरार नागापूर वि.का.सो.डी. र.रु. 10,00,00/- दिनांक 29/06/2010 बाळू सयाजी पवार करिता" हा बोजा आणि त्यासंबंधीची नोंद कमी केली असे.तसेच इतर हक्कात असलेला "भाडेपट्ट्याने बाळू सयाजी पवार यांनी सुरज संजय पवार यांना रक्कम रु. 3,34,650/- घेऊन क्षेत्र 0.40 दिनांक 01/04/2023 पासून कालावधी वर्ष 1 महिने 0 साठी भाड्याने दिला" हा शेरा व नोंद कायदेशीर मुदत संपल्यामुळे व विहित नियमांनुसार कमी केली असे.आदेशावरून नोंद केली असे.