Ferfar #3277 · गोंदेगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 334/2/3
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( सोसायटी बोजा कमी )
श्री.फकीरा शंकर खडांगळे यांनी मौजे- गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं -334/2/3 वर गोंदेगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गोंदेगाव ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 100000/- दिनांक -04/06/2007 व 200000/-दिनांक -14/07/2020 हा बोजा कमी केला असे.
सोसायटीच्या दिनांक -29/09/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.
( बोजा कमी- जप्ती बोजा )
मा.बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी सो.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नाशिक शाखा-लासलगांव ( ब विभाग ) ता.निफाड जि नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.इस्पे/लालसगांव/ 94/149 दिनांक -29/09/2026 प्रमाणे मौजे-गोंदेगाव ता-निफाड जि-नाशिक येथील श्री.फकीरा शंकर खंडागळे यांच्या गट नं 334/2/3 या क्षेत्रावरील संपूर्ण थकबाकी भरली असल्याने सदरच्या इतर अधिकारात दाखल असलेला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा-लासलगांव (ब विभाग ) ता.निफाड जि नाशिक यांचा जप्ती बोजा कमी केला असे.
विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र दिनांक-29/09/2026 पत्रावरून फेरफार नोंद केली असे.