सातबारा Watch

← तारुखेडले

Ferfar #5076 · तारुखेडले

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
264/1, 312/1
Talathi
योगेश सुधाकर करपे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजुस दाखल मौजे तारुखेडले येथील मिळकत गट नं. 312/1 पै क्षेत्र 1.01 आर आकार 4.80 व गट नं 312/1 पै क्षेत्र 0.51 आर. आकार 2.39 गट नं 312/1 पै 0.50 आर आकार 2.34 गट नं 264/1 पै 0.75आर आकार 3.22 याबाबत श्री.अर्जुन शिवनाथ जगताप व इ रा. तारुखेडले यांनी जमीन वाटपाबाबत मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडे अर्ज केला व मा. तहसिलदार सो. निफाड यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे क्र. आरटीएस / वाटप एसआर / 283/2026 दिनांक 12/10/2026 रोजी आदेश दिल्याने सदर मिळकतीचे खालीलप्रमाणे वाटप केले असे. अ क्रं गट नंबर क्षेत्र वाटपाने कब्जेदार 1 312/1पै 1.01 हे आर आकार 4.80 ज्ञानेश्वर शिवनाथ जगताप सदर क्षेत्रापैकी 0.51 आर पश्चिम बाजूकडून न.1 च्या वाटणीचे क्षेत्र व पश्चिम बाजूकडून न.3 चे वाटणीचे 0.50 आर 2 312/1पै 1.01 हे आर आकार 4.77 अर्जुन शिवनाथ जगताप सदर क्षेत्रापैकी 0.50 आर पश्चिम बाजूकडून न.2 च्या वाटणीचे क्षेत्र व पश्चिम बाजूकडून न.4 चे म्हणजेच पूर्व बाजूकडील क्षेत्र 0.51 आर 3 264/1 पै 0.38 हे आर आकार 1.63 ज्ञानेश्वर शिवनाथ जगताप गटातील पश्चिम बाजूकडील क्षेत्र 4 264/1 पै 0.37 हे आर आकार 1.59 अर्जुन शिवनाथ जगताप गटातील पूर्व बाजूकडील क्षेत्र गट नं ३१२/१ पैकी अर्जुन जगताप यांचे हिश्यात उत्तर बाजुने एक विहीर इले मोटार तसेच गट नं. ३१२/१ पासुन ते गट नं २६४/१ पावेतो असलेली पाईपलाईन मध्ये अर्जुन व ज्ञानेश्वर यांचा समसमान हिस्सा राहील. सदर पाण्याचा वापर हा ६-६ दिवस राहील. गट नं २६४/१ ज्ञानेश्वर यांचे वाटपास गेलेल्या क्षेत्रात एक विहीर असुन ती ज्ञानेश्वर यांचीच राहील. गट नं ३१२/१ मध्ये जाणेयेणेसाठी गटाच्या उत्तर बाजुने असलेल्या रस्तयाने जाणेयेणेच्या हक्कासह दरोब्सत मिळकत. तसेच गटनं २६४/१ मध्ये जाणेयेणेसाठी गटाच्या उत्तर बाजुने पुर्वेकडुन पश्चिमेकडे जाणाऱ्या सामाईक रस्त्याने जाणेयेणेच्या हक्कासह दरोब्सत मिळकत. अर्ज व मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / वाटप एसआर / 283/2026 दिनांक 12/10/2026 वरुन नोंद केली असे.