Ferfar #2162 · पडघे
पालघर, पालघर · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1/106/2/प्लॉटनं/7
- Talathi
- अभिषेक भरत पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
मौजे पडघे, ता. व जि. पालघर येथील गट क्रमांक 106/1/106/2/प्लॉटनं/7, क्षेत्र 14.00 आर.चौ.मी. या मिळकतीबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, मालमत्ता वसुली शाखा, मुंबई यांच्यामार्फत सुरक्षित कर्जाच्या वसुलीसाठी सुरक्षितताविषयक वित्तीय मालमत्तांचे प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभूती हिताची अंमलबजावणी अधिनियम, 2002 (SARFAESI Act, 2002) च्या तरतुदींनुसार सार्वजनिक ई-लिलावाची कार्यवाही करण्यात आल्याने सदर ई-लिलावामध्ये यशस्वी लिलाव खरेदीदार म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी श्री. संजीव वर्मा यांनी दिनांक 27/08/2026 रोजी विक्री प्रमाणपत्र निष्पादित केले आहे. सदर विक्री प्रमाणपत्र दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 13230 दिनांक 27/08/2026 अन्वये नोंदणीकृत आहे.
सदर विक्री प्रमाणपत्रानुसार मिळकतीची लिलाव विक्रीची रक्कम रुपये 70,00,000/- (अक्षरी रुपये सत्तर लाख मात्र) आहे. विक्री प्रमाणपत्रामध्ये खरेदीदार म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स यांचे नाव नमूद असून, संबंधित नोंदणी दस्ताच्या सूची क्रमांक 2 मध्ये दस्त ऐवज करून देणार बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे संजीव वर्मा व दस्त ऐवज करून घेणार मेसर्स रुद्रा इम्पेक्स तर्फे 1) श्री. मीत निलेश गडा व 2) श्रीमती भावना निलेश गडा यांची नावे नमूद असून मोबदला रक्कम 1/- नमूद आहे.
त्याअनुषंगाने, सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर पूर्वी खातेदार म्हणून नोंद असलेले श्री. अमित अशोक खामकर यांचे नाव कमी करून, विक्री प्रमाणपत्राच्या आधारे नवीन हक्कसंपादक म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स हे नाव 7/12 सदरी अधिकार अभिलेखात दाखल केले असे.