Ferfar #557 · नगावेपाडा
पालघर, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/2
- Talathi
- सोनाली किशोर डोले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजूस दाखल केलेली मौजे – नगावेपाडा ता.जि.पालघर येथील ग.क्र. 81/2, एकूण क्षेत्र 0.08.00 हे.आर ही जमीन आज रोजी निखील विकास गावड व इतर यांचे नावे नोंद आहे. ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेली भोगवटादार वर्ग -2 ची जमीन शासन आदेश दि. 04/03/2025 नुसार देय रूपांतरण अधिमुल्य रक्कम भरणा करून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करणेबाबत अर्जदार यांनी मा.जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडे अर्ज केलेला आहे.अर्जदार यांनी शासन राजपत्र दि. 04/03/2025 मधील निर्देशानुसार सन 2026-27 च्या प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 25 % रक्कम रुपये 39,875/- (अक्षरी रुपये एकोणचाळीस हजार आठशे पंचाहत्तर रुपये मात्र ) इतकी चलन क्र.MH010619196 202627M, दि. 22/09/2026 ने शासनास भरणा केलेली आहे.त्यान्वये मा .जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष .1/टे -जमीनबाब /सीआर-67/2026 दि.06/10/2026 नुसार आदेशातील अटी व शर्ती 1 ते 13 ला अधीन राहून भोगवटदार वर्ग -2 ची जमीन भोगवटादार वर्ग -1 अशी नोंद केली असे.
वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे.