सातबारा Watch

← काटाळे

Ferfar #1384 · काटाळे

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
तेजल नारायण राऊत
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे – काटाळे, ता.जि.पालघर येथील ग.नं 105 एकूण क्षेत्र 1.71.50 हे.आर. पो.ख. 0.22.40 , ही जमीन आज रोजी शिवनंदन रामचंद्र पाटील व इतर यांचे नावे दाखल असुन, जमिनमालक यांनी वरील वर्णनाचे आकाराच्या 40 पट नजराण्याची रक्कम रुपये 310/- (अक्षरी रक्कम तीनशे दहा रुपये मात्र) इतकी रक्कम चलन क्र. 50/2023, दि. 13/04/2023 रोजी सरकारी खजिन्यात भरणा केलेली आहे. कुळ वहिवाट शेतजमीन खरेदी विक्री अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी ह्यांच्या पुर्व परवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणी बाबत शासनाने वन व महसूल विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टेनन्सी 04 /2013, प्र.क्र./196 ज-1 दिनांक 11/02/2014 व सुधारित परिपत्रक दि. 07/05/2014 नुसार 7/12 चे कागदोपत्री दाखल असलेल्या ह्या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी दिल्याने मा.तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण ,पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर-44/2023 दि. 17/04/2023 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 6 ला अधीन राहून कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथिल करून इतर हक्कांतील “नि.स.प्र- कुळ कायदा कलम 43” ही नोंद कमी केली असे. तसेच भोगवटादार वर्ग 1 केली असे. वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे.