Ferfar #8945 · बोळींज
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 309/अ/1/ब
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे बोळींज येथील सर्वे क्र ३०९/अ/१/ब क्षेत्र ०.५४.५० हे. आर या ७/१२ सदरी पोष्ट व टेलिग्राफ खाते यांचे नाव दाखल आहे. प्रस्तुत जमीन ही फेरफार क्र. २६४३ दि. १६/०३/१९७४ नुसार तालुका आदेश क्र. LAND/WS/२५३७ दि. १९/१२/१९७३ नुसार जमिनीची कब्जा हक्काची रक्कम घेऊन जमिनीचा ताबा दि. १६/०३/१९७४ रोजी पोष्ट व टेलिग्राफ खाते यांना दिला होता. तरी, सदर पत्राच्या अनुषंगाने अधिकार अभिलेखाची तपासणी करून प्रस्तुत प्रकरणी सहाय्यक महाव्यवस्थापक ( नियोजन) महाव्यवस्थापक, BSNL कल्याण पश्चिम यांनी दिलेल्या अर्जानुसार व तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.महसूल/क.१/टे.२/हक्कनोंद/कावि/११२७/२०२६ दि. २२/१०/२०२६ नुसार ७/१२ सदरी असलेले पोष्ट व टेलिग्राफ खाते यांचे नाव बदलून सदर मिळकतीवर “भारत संचार निगम लिमिटेड” यांचे नाव दाखल करण्यात येत असे.