Ferfar #11280 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिन मिळकतीबाबत मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दिनांक 27/08/2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमन 1948 चे कलम 43 अन्वये 32-म प्रमाणपत्र निर्गमित होऊन 10 वर्ष पुर्ण झालेले आहेत,त्याअर्थी,महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासुन 10 वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर कार्यवाही करताना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026(दि.15 एप्रिल 2026 चे रापत्र) नुसार महसुल आकारणी 40 पट नजराणा आकारण्यात येऊ नये असे निर्देश आहेत.तरी बाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत असल्याने सदर जमिनीची भूधारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 अशी केली असे.
जमिनीचे वर्णन:-
स.नं.8/1 क्षेत्र 0.17.00 हे.आर.व पो.ख.0.03.00
स.नं.251/13 क्षेत्र 0.12.90 हे.आर
(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दिनांक 27/08/2026 वरुन)