Ferfar #5619 · आसनगांव
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे आसनगांव येथील जमिनीचे ७/१२ चे इतर अधिकारात खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद घेण्याबाबत शासन गृहविभाग यांचेकडील आदेश क्र. एमपीआयडी-०८२४/प्र.क्र.८८/पोल-१५ दि.०५/०५/२०२६ प्राप्त झाले तसेच मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील पत्र क्र. बीडी/महसूल/टे-२/एमपीआयडी/हरम्या डे/कावि-५८४७/E-3339801 दि. २०/०७/२०२६ लगत मा. तहसिलदार ता. शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसुल/क-१/वसुली/टे-३/कावि-२९४/२०२६ दि. ०३/०८/२०२६ अन्वये स. नं. च्या इतर हक्कात खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद दाखल करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले तरी शासन गृहविभाग यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्राप्रमाणे ७/१२ च्या इतर अधिकार सदरी खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद केली असे.