Ferfar #1421 · तलवली तर्फ घोरड
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल स न ५६/९ व इतर हया जमिनीच्या ७/१२ उता-यावरील नोंद असलेले कालबाहय नाव बोजा कमी करणेबाबत श्री भाई सुधाकर शिंदे यांनी अर्ज सादर केला असून प्रकरणी समाविष्ट गट नं ५६/९,५६/१०.५६/१२ चे ७/१२ चे अवलोकन केले असता इतर अधिकारात गोपाळ विठू यांचा बोजा फेरफार क्र २१० अन्वये नोंदविलेचे दिसून येते. फेरफार क्र २१० चे अवलोकन केले असता सदरचा फेरफार दि २८/०२/४३ रोजी नोंदविण्यात आलेला आहे. सदरचा बोजा हा ८३ वर्षा पुर्वीचा असल्याचे दिसून येते. तरी प्रकरणी सदरचा कालबाहय बोजा कमी करणेकामी मुदत अधिनियम १९६३ शासन निर्णय क्रमांक टीएजी/१०८८ प्र.क्र. २२१५/म.११ दिनांक ३१/१२/१९८८ क्र.३६ अनुसूचित मुदत मर्यादा कलम (२) आणि (३) भाग-५ कलम ६१ (क) अन्वये व महाराष्ट्र जमिन महसूल (नोंदवहया तयार करणे व अदयावत करणे) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार कालबाहय बोजा बोजा कमी करणेबाबत मा तहसीलदार मुरबाड यांचेकडील पत्र क्र महसूल/हक्कनोंद/टे-2/कावसी-351/26 दिनांक 04/09/2026 प्राप्त झालेने नोंद केली असे