सातबारा Watch

← उचले

Ferfar #1130 · उचले

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
358
Talathi
प्रशांत पंढरीनाथ खाकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/कावि/७१८/२०२६ आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे उचले येथील सर्व्हे क्रमांक ३५८ (जुना सर्व्हे क्र. ७२/७) या बाबत ३२ म चा इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत श्री. रहीम हुसेन पटेल यांनी अर्ज सादर केला आहे. त्यानुसार संबधित लेजर क्रमांक ५७/१७० ची पडताळणी केली असता खालील तक्त्यात नमुद जमीन कुळकायद्यान्वये ३२ ग आदेश क्रमांक १६७८ दिनांक ३०/०५/१९६३ अन्वये सखाराम मालु पाटील चौधरी यांना मिळाली असल्याचे दिसुन येते. सदर जमीनीवरील कुळखरेदीचा बोजा रक्कम रुपये १०२२.५३/- (अक्षरी एक हजार बावीस रुपये त्रेपन्न पैसे मात्र) व त्यावरील व्याज जमीन मालक वाडिलाल गुलाबचंद शहा यांचा बोजा १७/०१/१९७४ रोजी शासन (पी. एल. ए. खात्यात) जमा केलेला असुन त्यानुसार या कार्यालयाकडून त्यांना त्यावेळी ३२ म प्रमाणपत्र दिनांक २५/०८/१९७७ निर्गमित केल्याचे दिसुन येते. सद्यस्थितीत ७/१२ चे इतर हक्क सदरी जमीन मालक यांचा बोजा दिसून येत आहे. ३२ म खरेदी प्रमाणपत्र निर्गमित असल्यामुळे, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधील तरतुदी प्रमाणे व मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि/ ७१८/२०२६,दिनांक ३०/१०/२०२६ नुसार अधिकार अभिलेखाच्या नियमाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्कातील, जमीन मालक यांचा बोजा कमी करणेची कार्यवाही केली असे. (नोंद. मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि/ ७१८/२०२६,दिनांक ३०/१०/२०२६ नुसार)