सातबारा Watch

← एकसर

Ferfar #5938 · एकसर

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-17
Objection until
2026-07-07
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
अमृता अनिल मयेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/04/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी आज रोजी १) वामण पांडु पाटील, २) गणेश राजाराम पाटील, ३) चंद्रशेखर राजाराम पाटील, ४) प्रतिमा उमेश पाटील, ५) राजेश प्रभाकर पाटील, ६) विजय प्रभाकर पाटील, ७) संध्या हरेश्वर पाटील, ८) हिरा प्रभाकर पाटील, ९) प्रमोद सखाराम भोईर, १०) मनीषा महेंद्र भोईर, ११) योगिता मनोहर भोईर, १२) श्रीकांत सखाराम भोईर यांची सामाईक नावे दाखल आहे. मूळ ७/१२ सदरी १) वामण पांडु पाटील, २) राजाराम पांडु पाटील ही नावे होती, त्यापैकी राजराम पांडु पाटील हे मयत असल्याने त्यांच्या वारसांची नावे फेरफार क्र. ५९०९ ने दाखल झाली आहेत. वर नमूद जमीन मालकांपैकी राजाराम पांडु पाटील यांच्या वारसांनी - १) गणेश राजाराम पाटील, २) चंद्रशेखर राजाराम पाटील यांनी नमूद सर्वे क्र.६५/१ मधील एकूण २१७५ हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी आपला अविभाज्य हिस्सा, दि. २८/०१/२०१६ रोजी खरेदीखताने र.रु.५७,००,०००/- घेऊन, दामजी के. देढीया यांना विकला. सदर व्यवहार सह दुय्यम निबंधक बोरीवली ३ यांचेकडे दस्त क्र. ७२३/२०१६ ने नोंदणीकृत करून, त्याचे पूर्ण मुद्रांक शुल्क अदा करण्यात येऊन, त्याचा सूची क्र. २ आलेला आहे. तसेच, वर नमूद जमीन मालकांपैकी संध्या हरेश्वर पाटील आणि १) प्रमोद सखाराम भोईर, २) मनीषा महेंद्र भोईर, ३) योगिता मनोहर भोईर, ४) श्रीकांत सखाराम भोईर यांची आई - कै. अनुसया सखाराम भोईर यांनी नमूद सर्वे क्र. ६५/१ मधील एकूण २१७५ हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी आपला अविभाज्य हिस्सा, दि. १०/०६/२०१६ रोजी खरेदीखताने र.रु.१४,००,०००/- घेऊन, दामजी के. देढीया यांना विकला. सदर व्यवहार सह दुय्यम निबंधक बोरीवली ३ यांचेकडे दस्त क्र. ४६०३/२०१६ ने नोंदणीकृत करून, त्याचे पूर्ण मुद्रांक शुल्क अदा करण्यात येऊन त्याचा सूची क्र. २ आलेला आहे. तरी नोंदणीकृत दस्ताने मौजे एकसर, ता. बोरीवली येथील स.न. ६५/१ ह्या ७/१२ सदरी, क्षेत्र ८७२ चौ.मी. वर दामजी के. देढीया हे नाव दाखल करणेस नोंद केली असे. (नोंद- अर्ज, जबाब, नोंदणीकृत दस्त सूची क्र. २ व इतर कागदपत्रे इ.)