Ferfar #3320 · चिंध्रण
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- योगेश देवीदास खैरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री राजू शिवराम सोनावळे ता.पनवेल जि.रायगड यांनी मा.अपर तहसीलदार कार्यालय पनवेल येथे सादर केलेले अर्ज व प्रतिज्ञापत्र/नोटरी विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७ मे, २०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत. त्याअनुषगाने महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2009/25530 व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र .टी एन सी -४ /२०१३ /प्र .क्र .१९६ /ज -1 दि .७ मे २०१४ मधील तरतुदीनुसार सदर 7/12 वरील नियंत्रीत सत्ता प्रकारचा शिक्का भोगवटादारवर्ग 2 कमी करून सदर जमीन भोगवटादार वर्ग 1 करण्यात आली.
सबब वरील नोंद मा.अपर तहसिलदार साहेब पनवेल यांचे कडील आदेश क्र.कुळवहीवाट/कात-4/एस.आर.25/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे नोंद केली असे.