Ferfar #1714 · भेरले
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/2
- Talathi
- प्रविण शिवाजी दड्डेकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे भेरले, ता. पनवेल येथील मिळकत गट क्रमांक १२२/२, क्षेत्र ०.०३.५० हे.आर., आकार ०.३१ पैसे या जमीन मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल यांचे न्यायालयात दाखल आरटीएस अपील क्र. ४५७/२०२६ प्रविण गोविंद माळी विरुद्ध व्यंकट नरसू कामाठी व इतर यामध्ये दिनांक २९/१०/२०२६ रोजी पारित झालेल्या अंतिम आदेशान्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येत आहे:
१. सदर आदेशातील मुद्द्यांनुसार वादी श्री. प्रविण गोविंद माळी यांचे आरटीएस अपील मंजूर करण्यात आले आहे.
२. त्यानुसार सदर मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार सदरात असलेला शेरा श्री. व्यंकट नरसू कामाठी यांचा र.रु. ३३.३७/- देणेचे आहे अशी पोकळीस्त हा प्रलंबित बोजा/शेरा पूर्णपणे कमी (रद्द) करण्यात येत आहे.
३. मा. न्यायालयाच्या आदेश क्र. ४ मधील निर्देशानुसार खर्चाबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.
सदरची नोंद मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या आदेश क्र. क्र.टेनन्सी/काल-४/आरटीएस अपिल क्र. ४५७/२०२६, दिनांक २९/१०/२०२६ अन्वये फेरफार नोंदवली.