सातबारा Watch

← नांदगाव

Ferfar #2201 · नांदगाव

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/12, 44/6
Talathi
आकाश तानाजी मदने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोंकण भवन पनवेल यांचेकडील आदेश क्र. अपिल.डेस्क/ आर.टी. एस./ रिव्ही./९७०/२०२५ मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोंकण भवन यांचे कार्यालय पनवेल दिनांक २९/०४/२०२६ नुसार खालील प्रमाणे आदेश पारित झाले असून अपर जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांचे हक्कनोंद अपील क्र. १७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२५ कायम करणेत येत आहे. अपर जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांचेकडील आदेशानुसार उपविभागीय अधिकारी,पनवेल उपविभाग,पनवेल यांचेकडील क्र.आरटीएस अपील क्र.२७०/२०२३ दिनांक २०/०२/२०२४ रोजीचा आदेश कायम करणेत येत आहे . उपविभागीय अधिकारी,पनवेल उपविभाग,पनवेल यांचे आदेशानुसार मौजे नांदगाव ता. पनवेल, येथील फेरफार नोंद क्र. १३२९ व १८३२ रद्द करण्यात येत असून मूळ जमीन धारक रामा पदु खुटले यांची वारसा नोंद व त्यापुढील वारसांच्या नोंदी रद्द करण्यात येऊन रामा पदु खुटले यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले. फेरफार नोंद क्र १६१८ व या दावा मिळकतीसाठी रद्द करण्यात आले असून त्याप्रमाणे इतर हक्कातील हरिभाऊ बेंडू पाटील यांची वारस नोंद रद्द केल्याने हरिभाऊ बेंडू पाटील यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली असे.