सातबारा Watch

← कोन

Ferfar #2543 · कोन

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1
Talathi
अमित तानाजी ताथवडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या गट नंबर ची जमीन ही नियंञीत सत्ता प्रकाराने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम ३२ ग प्रमाणे श्री.धर्मा काथोड शिसवे रा.कोन ता.पनवेल जि.रायगड यांचे नावे असुन सदर जमीन कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या जमीनी खरेदी दिनांकापासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/२०१३ /प्र.क्र.१९६/ज-१ दि. ०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम,२०२६ दि.१५ एप्रिल २०२६ मधील तरतुदीप्रमाणे प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन वर्ग १ ची केली.वरील नोंद सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात-४/एस.आर.१३०/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.