सातबारा Watch

← डोलघर

Ferfar #565 · डोलघर

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/2/ब/2
Talathi
सचिन हौशिराम शेळके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मौजे डोलघर, ता. पनवेल येथील सर्व्हे नं. ५७/२/ब/२ (एकूण क्षेत्र ०.५७.० हे.आर) या मिळकतीवर नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. ५१७०/२०२६ दिनांक १८/०८/२०२६ अन्वये फेरफार क्र. ५१५० ने सामाईक क्षेत्राची नोंद करण्यात आलेली आहे. सदर खरेदीखतातील पान क्र. ५ वरील तपशिलानुसार खरेदीदारांचे खरेदी केलेले क्षेत्र खालीलप्रमाणे नमूद आहे: १) श्रीमती/कु. रुचिका विद्याधरराव दंडाळे — क्षेत्र ०.२०.० हे.आर २) श्रीमती/कु. सुलक्षणा सोपान बोडके — क्षेत्र ०.१७.० हे.आर ३) श्रीमती/कु. उषा अमरदीप वाकडे — क्षेत्र ०.२०.० हे.आर तथापि, फेरफार क्र. ५१५० अन्वये संपूर्ण क्षेत्र ०.५७.० हे.आर हे सामाईक नोंदविले गेले असल्याने, मा. अपर तहसीलदार कार्यालय पनवेल यांच्या जावक क्र. हक्कनोंद/कात-४/२७०८/२०२६, दिनांक ०४/११/२०२६ रोजीच्या पत्रान्वये तसेच खरेदीखत दस्त क्र. ५१७०/२०२६ मधील नोंदीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार खरेदीदारांच्या नावापुढे खरेदीखताप्रमाणे प्रत्येकी क्षेत्र खालीलप्रमाणे स्वतंत्र दर्शविण्यासाठी/दुरुस्तीसाठी ही नोंद घेण्यात येत आहे: • सर्व्हे नं. ५७/२/ब/२ क्षेत्रफळ वाटप: o १) रुचिका विद्याधरराव दंडाळे — ०.२०.० हे.आर o २) सुलक्षणा सोपान बोडके — ०.१७.० हे.आर o ३) उषा अमरदीप वाकडे — ०.२०.० हे.आर o एकूण क्षेत्र : ०.५७.० हे.आर