Ferfar #1670 · धावटे
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/3/ब/1
- Talathi
- लतिका महादेव जाधव
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत अर्जदार श्रीम.शितल हरिश्चंद्र वातेरे, रा.धावटे, ता.पेण, जि.रायगड यांनी मौजे धावटे, ता.पेण येथील स.नं./ग.नं. २५/३/ब/१ या मिळकतीच्या ७/१२ सदरी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम १५५ नुसार नावात दुरुस्ती करुन मिळणेबाबत दि.२ ४/०२/२०२६ रोजी अर्ज सादर केला होता.
अर्जंदार यांच्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसिलदार पेण यांचे कार्यालयात दि.२०/०८/२०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली असून, स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे असे नावात बदल करणेबाबत विनंती केली आहे. सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र RNI NO. MAHBIL२००९/३१८७४, दि.३-०९ डिसेंबर २०१५ अन्वये नोंदणी क्र.M-१५६६१९२ नुसार स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे अशी दुरुस्ती भोगवटादार सदरी असलेल्या नावात करणे आवश्यक असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ नुसार अभिलेख अद्यावत करणे योग्य वाटत असल्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार, प्रश्नाधिन मिळकतीच्या संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ उता-यावरील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या नावात स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे असा बदल करणेकामी मा. तहसिलदार पेण यांचेकडील पारित आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/२०२६/४८/३०९५, दिनांक १७/०९/२०२६ नुसार गावदप्तरी नोंद केली.