Ferfar #381 · रेवळी
म्हसाळा, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/5
- Talathi
- शेखर कैलास सोनवणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनिबाबाबत मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,म्हसळा यांचे न्यायालयात कलम 32 ग प्रमाणे दावा क्रमांक 19/2026, अर्जदार (कुळ) श्री.तुकाराम रामा पाटील वै.9 विरुद्ध सामनेवाला (जमीन मालक) खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो दावा सुरु होता. अर्जदार यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (ग) अन्वये मौजे रेवळी येथील स.नं.26/5 ,क्षेत्र 0.9360 हे.आर, आकार 1.12 या मिळकतीबाबत खरेदीची किंमत ठरवून मिळणेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण, म्हसळा यांच्याकडील आदेश/कलम 32ग /दावा क्रमांक 19 /2026 दि.11/08/2026 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आलेला आहे.
1.अर्जदार यांचा दावा मान्य करण्यात येत आहे.
2. मौजे रेवळी येथील स.नं.26/5 ,क्षेत्र 0.9360 हे.आर, आकार 1.12 या मिळकतीच्या 7/12 चे इतर हक्कातील अर्जदार कुळ तुकाराम रामा पाटील व. 9 या कुळांची नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावीत व किंमतीचा बोजा इतर हक्कात दाखल करण्यात यावा.
3.किंमतीचा बोजा:
स.नं.26/5 : जमिनीची किंमत=224, व्याज=716, एकूण (किंमत+ व्याज)=940
4.वरील सर्वांची एकूण 940 रुपये रक्कम शासकीय खजिन्यात जमा करावी.
5..सर्व रक्कम शासकीय खजिन्यात जमा झाल्या नंतर अर्जदार कुळास 32 (म) प्रमाणे दाखला देण्यात यावा व कलम 43 नुसार दाखला ठेवण्यात यावा.
वरील आदेशाप्रमाणे कुळ श्री.तुकाराम रामा पाटील वै.9 यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली व जमीन मालक खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो. यांचे नाव इतर अधिकारात बोजासह दाखल केले व भू-धारणा: भोगवटादार वर्ग 2 असा बदल केला.