सातबारा Watch

← दारुंबरे

Ferfar #3147 · दारुंबरे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
431
Talathi
राहुल रामेश्वर आरडक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र. १५२/२०२६ आदेश दिनांक : 14/08/2026 मा.उपविभागीय अधिकारी सो, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांच्या न्यायालयात आरटीएस अपील क्र. १५२/२०२६ मधील दिनांक १४/०८/२०२६ च्या आदेशानुसार मौजे दारुंब्रे येथील गट नं. ४३१ बाबत फेरफार क्र. ३०७ पाहता श्रीपती बहिरु वाघोले हे मयत झाल्यावर मुलगी गऊ बहिरु वाघोले, शाऊ व मथी यांचे नाव ८ आणे क्षेत्रास तर गणपती बहीरु वाघोले यांचे नांव ८ आणे क्षेत्रास दाखल करावे असे फेरफारात नमुद आहे. परंतु ७/१२ वर अंमल देताना फक्त गऊ को. चिंधु राक्षे यांचे नांवे ८ आणे तर गणपती बहिरु वाघोले यांचे नांवे ८ आणे असे नमुद झाले आहे.मयत श्रीपती बहिरु वाघोले यांच्या वारसांसंदर्भात ७/१२ उताऱ्यावर यापूर्वी केवळ गऊ को. चिंधु राक्षे यांच्या नावे नोंदवलेल्या ८ आणे क्षेत्रामध्ये, माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार इतर कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करण्यात येत आहेत. तदानुसार गऊबाई को. चिंधु राक्षे यांच्या नावासोबतच शावु उर्फ शावुबाई भागुजी शेंडगे व मथा उर्फ मथाबाई दादाभाऊ तरस यांची नावे सामाईकात दाखल करणेत येत आहेत.आदेशानुसार नोंद करून आदेश फाईलीस दाखल केला असे.