Ferfar #3042 · आढले बुद्रुक
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- भोर संजय बाळू
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : वतन /एस आर /१८/२०२६
आदेश दिनांक : ०५/१०/२२६
मा तहसील कार्यालय मावळ जि.पुणे यांचेकडील क्र वतन /एस आर /१८/२०२६ दि ०५/१०/२२६ च्या आदेशानुसार मा तहसिलदार मावळ यांनी मौजे आढले बुद्रुक ता मावळ जि पुणे येथील जमीन गट नंबर २२ खालील अटी व शर्तीवर रिग्रॅन्ड केली असे .
१)उक्त विषयांकित जमिनीच्या इतर अधिकारात नवीन शर्तीवर (भोगवटादार वर्ग २ )रिग्रॅन्ड शेरा दाखल करावा
२)अर्जदार यांनी प्रस्तुत मिळकत रिग्रॅन्ड करणेसाठी सादर केलेले कागदपत्रे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आल्यास या अन्वये दिलेली मान्यता रद्द करून नुकसानभरपाई न देता पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल व जमीनिसदर्भात शासन नियमानुसार इतर परवानगीची आवश्यकता असलेस ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील
३)जमीन धारकाने जमिनीचा वापर शेती प्रयोजनांसाठी करायचा आहे
४)सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी व शेती व्यतिरिक्त प्रयोजनांसाठी जमिनीचा वापर करणेचा झाल्यास बाजारभावच्या ५०% नजराणा शासनास भरावा लागेल
५)प्रस्तुत आदेशामुळे इतर प्रचलित कायद्याचे उल्लघन होणार नाही याची दक्षता धारकांनी घ्यावी
सदरची नोंद न्यायालयाच्या आदेशावरून केली असे व कागदपत्रे फायलीस दाखल असे.