सातबारा Watch

← पेठ

Ferfar #3474 · पेठ

हवेली, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
190, 191
Talathi
महादेव श्रीराम भारती
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 मा. अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळशाखा यांचेकडील आदेश क्र. पीटीके/कावि/११८९/२०२६ दि.२९/१०/२०२६ लगत मा. तहसिलदार, अपर तहसिल कार्यालय लोणीकाळभोर यांचेकडील पत्र क्र. कु.का./कावि/१०५/२०२६ दि.०२/११/२०२६ अन्वये, मौजे पेठ ता. हवेली जि.पुणे येथील गट नं. १९० क्षेत्र १ हे.१० आर + पो.ख. ० हे.२१ आर एकुण क्षेत्र १ हे.३१ आर व गट नं. १९१ क्षेत्र ० हे.४९ आर + पो.ख. ० हे.०९ आर एकुण क्षेत्र ० हे.५८ आर या मिळकतीचा भोगवटादार वर्ग- २ मधून भोगवटादार वर्ग- १ असा बदल वरिल आदेशान्वये केला असे तसेच सदर ७/१२ च्या इतर अधिकारात नमूद असलेला “शेती व्यतिरिक्त वापरास मुल्यांकनाच्या ५०% रक्कम भरणेस पात्र” हा शेरा सदर आदेशान्वये कमी केला असे. तसेच सदर आदेशातील नमूद अटी व शर्ती नूसार शेती व्यतिरिक्त जमिन वापरास सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेण्याचे आहे. तसेच कोणत्याही प्रचलित कायद्यातील तरतुदीचा भंग होता कामा नये. आदेशावरून वरीलप्रमाणे ७/१२ मध्ये बदल करून आदेश दप्तरी दाखल केला असे.