Ferfar #17543 · महंमदवाडी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेश प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/२०५३/प्र.क्र.८७१/ज-५ आणि प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/१६८०/प्र.क्र.७६५/ज-५ दिनांक २५/०५/२०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे महंमदवाडी,ता. हवेली,जि.पुणे येथील स. नं. ९६/१, स. नं. ९६/७,स. नं. ९६/२,स. नं. १२/४अ,स. नं. १२/४ब आणि स. नं. ३२/१ या मिळकतीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ अन्वये आदेशात नमुद २)अर्जदार यांचा फेरतपासणी अर्ज अंशत: मान्य करणेत येत आहेत,३)परिणामी मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त सो , पुणे विभाग, पुणे यांचे क्र.आरटीएस/रि/पुणे/२०१/२०२३ व क्र.आरटीएस/रि/पुणे/५३२/२०२३, दि. २५/०८/२०२५ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत.४)परिणामी तहसिलदार सो हवेली यांचे क्र.जमीन२/वाटपदरखास्त/एसआर/०३/२०१८,दि.२३/०५/२०२२ आणि मा.उपविभागीय अधिकारी सो हवेली यांचे क्र. आरटीएस/अपील/क्र.४०४/२०२२, दि.२९/१२/२०२२ आणि मा.अपर जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आरटीएस अपील क्र.२६४/२०२३, दि.२७/०६/२०२३,आरटीएस अपील क्र. २११/२०२३ ,दि.११/०९/२०२३ व आरटीएस अपील क्र.५७८/२०२३. दि.१०/०५/२०२४ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. आणि ५.परिणामी तहसिलदार सो हवेली यांनी प्रस्तुत प्रकरणातील हुकूमनाम्याची अंमलबजावणी करणेकामी यथास्थित वस्तुस्थितीदर्शक मांडणी करुन अधिकार अभिलेखातील क्षेत्र व धारक याचे अवलोकन करुन मा.दिवाणी न्यायालयाकडून डिक्री अंमलबजावणीकामी सुधारीत आदेश प्राप्त करुन घ्यावेत.दरम्यान मा. दिवाणी न्यायालयाचे हुकूमनाम्याप्रमाणे तहसिलदार सो यांनी वाटपाची कार्यवाही व वाटपाचे अंतिम आदेश होईपर्यंत अधिकार अभिलेखात "जैसे थे परिस्थिती" ठेवण्यात यावी.सबब मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेश प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/२०५३/प्र.क्र.८७१/ज-५ आणि प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/१६८०/प्र.क्र.७६५/ज-५ दिनांक २५/०५/२०२६ रोजीच्या आदेशान्वये ७/१२ चे इतर अधिकारात " मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ अन्वये फेरतपासणी अर्ज अंशत: मान्य करणेत आल्याने अधिकार अभिलेखात "जैसे थे परिस्थिती" ठेवण्यात यावी." हा शेरा दाखल करणेत आला आहे.