Ferfar #14915 · गराडे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-20
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 2133
- Talathi
- वैभव सदाशिव टकले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
आदेश :- 32 एम प्रमाणपत्र नोंद
मौजे गराडे, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील गट नं.2133 यांसी क्षेत्र 0 हे.49 आर, पोख 0 हे. 01 आर, आकार 1 रु.74 पैसे या मिळकती मूळच्या शुभदा गंगाधर उकिडवे यांचे मालकीच्या असून त्याबाबत लव्हु लक्ष्मण ढोणे,अंकुश लक्ष्मण ढोणे, तुकाराम गणपत ढोणे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र मिळविले असल्याने कब्जेदार सदरी असणारे शुभदा गंगाधर उकिडवे यांची नावे कमी करून वरील इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली असे व जमिनीचे धारणा प्रकारात भोगवटदार वर्ग-2 व इतर हक्कात नवीन शर्त व कुळ कायदा कलम 43 क चे बंधनास पात्र याप्रमाणे शेरा दाखल केला असे व इतर हक्कातील बाकी नावे कायम ठेवली असुन या शेतजमीन मिळकतीबाबतचे मा.शेतजमीन न्यायाधीकरण तथा मा.तहसिलदार सो.पुरंदर यांचे एएलटी/आय/आय पी/86/2025 दिनांक 07/11/2025 रोजीचे आदेशान्वये 32 एम (खरेदी प्रमाणपत्र) नोंदणी हा या दस्ताचा मुख्य विषय असे.
दु.नि.पुरंदर यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्र.1711/2026 दि.10/02/2026 व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.