Ferfar #4058 · माळेवाडी
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- अलका अर्जुन सरगय्ये
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
मौजे माळेवाडी ता. श्रीरामपूर येथील गट क्रमांक ७८/२ (क्षेत्र ० हे. ९९ आर पो.ख. ० हे. ०२ आर) ही जमीन सीलिंग वाटपातील नवीन व शर्थीची असून सदर जमीन ज्ञानदेव बाबुराव गायकवाड हे भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करीत आहेत.
अर्जदार ज्ञानदेव बाबुराव गायकवाड यांनी सदर जमिनीचे कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण होण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ चे कलम २७ व २९ मधील तरतुदीनुसार आणि शासन नियमांनुसार निश्चित केलेली २५% नजराणा रक्कम रु. २१०५८५/- (अक्षरी दोन लाख दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये) शासन जमा झाल्याची खात्री करून सदर जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यावरून मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेश क्र. कावि/एस.आर/१७२/२०२६ दि. २७/१०/२०२६ नुसार खालीलप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात येत आहे:
१. मौजे माळेवाडी येथील गट क्र. ७८/२ मधील क्षेत्र ० हे. ९९ आर व पो.ख. ० हे. ०२ आर या जमिनीचा भोगवटादार वर्ग वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ असा करण्यात यावा.
२. अधिकार अभिलेखातील (७/१२ उतारा) इतर हक्क आणि भोगवटादार सदर असणारा नवीन शर्त / सीलिंग वाटप / हस्तांतरास बंदी असा शेरा किंवा नोंद रद्द करण्यात यावी.
३. सदर मंजुरी ही मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहील.
मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेश क्र. कावि/एस.आर/१७२/२०२६ दि. २७/१०/२०२६ नुसार नोंद केली असे.