Ferfar #3695 · सुलतानपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, सि,डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.777/2023 नुसार
वादी रोहिदास लक्ष्मण खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर येथील गट नंबर 36 क्षेत्र 0 हे 72 आर हे संपूर्ण क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेले आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. तसेच गट नंबर 75/3 यापैकी क्षेत्र 1 हे 39 आर यापैकी मधली वाटणी 0 हे 40 आर क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी दिलेले आहे.
प्रतिवादी नं.1 लक्ष्मण मारुती खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर येथील गट नंबर 75/3 यापैकी क्षेत्र 1 हे 39 आर यापैकी उत्तरे कडील 0 हे 59 आर क्षेत्र कायम स्वरुपी या वाटपाने देण्यात आलेली आहे.
प्रतिवादी नं.3 सोमनाथ लक्ष्मण खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा येथील गट नंबर 75/2 क्षेत्र 0 हे 51 आर खराबा 0 हे 10 आर हे संपूर्ण क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेले आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे. तसेच गट नंबर 75/3 यापैकी 1 हे 39 आर यापैकी मधील हे 40 आर दक्षिणे कडील बाजुचे क्षेत्र या वाटपाने देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.2 लताबाई लक्ष्मण खाटीक व प्रतिवादी नं. 4 सुनिता शिवाजी नागोडे व प्रतिवादी नं.5 संगिता वाल्मिक सांळूके यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा हक्क अधिकार कायम स्वरुपी सोडून दिलेला आहे त्यांना दावा मिळकती मध्ये काहीएक मागणे नाही.
तसेच गट नंबर 75/2 मधील बोअरवेल ही वादी व प्रतिवादी नं.3 यांचे मध्ये सामाईक राहिल. तसेच गट नंबर 36 मधील जाणारी पाईपलाईन ही वादी यांची स्वतःची राहील.
फायलिंग दस्त क्र 607/2023 दि 29/12/2023 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कलम 89 (अ)अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केली असे.