Ferfar #7467 · बऱ्हाणपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/4
- Talathi
- संध्या सुधाकर गडकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
मा. तहसिलदार नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एस.आर/276/2026 नेवासा,दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे बऱ्हाणपूर ता. नेवासा येथील गट नं 82/4 क्षेत्र 0.88 हे आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणे बाबत अर्जदार बापुसाहेब जगन्नाथ सटाले,रा. बऱ्हाणपूर ता. नेवासा यांनी अर्ज सादर केलेला आहे. वाटप जमिन ही जायकवाडी प्रकल्पग्रस्त कै.श्री जगन्नाथ पाटीलबा सटाले यांना फेरफार क्रमांक 1818 दिनांक : 08/03/78 नुसार जमिन वाटप होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अर्जदार यांची मूळ संपादन जमीन मौजे देवाळणे, तालुका शेवगाव येथील ग.नं. 121/3 ही जमीन जायकवाडी प्रकल्पासाठी संपादित झालेली असून जमीन भोगवटादार वर्ग 1 असलेबाबत अहवाल सादर केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी दिनांक 27/08/2026 रोजी कब्जाहक्क रक्कम रु. 3058/- ही संपूर्ण कब्जाहक्काची रक्कम भरलेली आहे.
सबब मा. जिल्हाधिकारी अहमदनगर,पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे कडील पत्र क्र. कावि / 26क/295/2019,दिनांक : 19/06/2019 नुसार प्राप्त अधिकारान्वये तहसिलदार नेवासा यांनी गट नं 82/4,क्षेत्र 0.88 हे आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणे साठी परवानगी दिली असुन वाटप जमिन गट क्र. 82/4 चे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असुन या 7-12 उताऱ्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात आला आहे.