सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9706 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
144/अ, 144/ब
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 सिव्हिल जज्ज साहेब, ज्यू.डी. शेवगाव यांचेकडील रे.मुऩं. 365 /2026 दी.20/08/2026 चा हुकुमनामा झालेवरुन वादी व प्रतिवादी यांचेमध्ये कोर्ट सुलेनामा खालीलप्रमाणे झालेला आहे. वादी राजेंद्र अशोक प्रतिवादी अशोक पुंजा जमधडे व इतर या कामी वादी, प्रतिवादी यांचे मध्ये खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो मान्य व्हावा व त्याप्रमाणे महसुली दप्तरी नोंदी व्हाव्यात. १) वादीचा दावा प्रतिवादींनी मान्य केला आहे. २) दावा कलम १ मधील शेतजमीन गट नं. १४४/ब क्षेत्र १ हेक्टर ४८ आर, आकार ५ रु. २५ पैसे ही शेतजमीन वादी राजेंद्र अशोक जमधडे यास दिलेली आहे. सदरील शेतजमीन गट नं. १४४/ब मध्ये चालू पाण्याची विहीर असून ती व तीचे पाणी घेणेचा हक्क वादी राजेंद्र यास दिला आहे. ३) दावा कलम १ मधील शेतजमीन गट नं. १४४/अ क्षेत्र ० हेक्टर ४९ आर + पो.ख. ० हेक्टर ३ आर, आकार १ रु. ६२ न. पैसे ही शेतजमीन प्रतिवादी नं. १ अशोक पुंजा जमधडे यांना भारी प्रतीची देण्यात आली आहे. ४) दावा मिळकती मधील हिस्सा प्रतिवादी नं. २ सुमन यांनी सोडून दिलेला आहे. येणे प्रमाणे वादी प्रतिवादी मध्ये सुलेनामा झाला असून तो मान्य आहे सिव्हिल जज्ज साहेब, ज्यू.डी. शेवगाव यांचेकडील रे.मुऩं. 365 /2026 चा सुलेनामा झालेवरुन सदर नोंद केली असे