Ferfar #3830 · संक्रापूर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- थोरवे एन एस
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि./जमीन-2/79१/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा. तहसिलदार, राहुरी यांचे कार्यालयीन पत्र क्र. ककावि./जमीन-2/79१/2026 दिनांक 05/10/2026 आणि रस्ता केस नं. 14/2026 मधील निकालपत्र दिनांक 09/07/2026 अन्वये मौजे संकापुर येथील गट क्रमांक 13/2 मधून गट क्रमांक १३/२ मध्ये जाण्यासाठी रस्त्याचा अधिकार मान्य करण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/प्र के 47/ज-1 अ/मुंबई दि. 22 मे 2025 मधील तरतुदींनुसार सदर रस्त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्क सदरी घेण्यात येत आहे.
अर्जदार/वादी पांडुरंग देवराम पांढरे यांना मिळकतीमध्ये जाण्या-येण्यासाठी प्रतिवादी १. सुंदराबाई बाळासाहेब पांढरे व २. कांतीलाल नाना पांढरे यांच्या मिळकतीमधून सामायीक बांधावरून दक्षिणोत्तर २८० फूट लांब व पूर्व-पश्चिम १० फूट नवीन रस्ता तडजोडनाम्यानुसार मंजूर झाला आहे.
त्यानुसार मौजे संकापुर येथील संबंधित गटाच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात रस्ता केस नं. १४/२२६ मधील आदेशानुसार पांडुरंग देवराम पांढरे व इतर यांना १० फूट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क राहील अशी नोंद घेतली असे
सदर नोंद मा. तहसिलदार, राहुरी यांचे कार्यालयीन पत्र क्र. क कावि./जमीन-2/79१/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये घेतली असे.