सातबारा Watch

← वांजुळपोई

Ferfar #4107 · वांजुळपोई

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1, 16/2, 16/3/1, 17/1/1, 17/1/3, 17/1/4, 19
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन 2/555/2026 आदेश दिनांक : 13/07/2026 मौजे वांजूळपोई येथील गट नं 20/1 मधील बाळासाहेब गेणु रेवाळे यांनी रस्ता केस नं 14/2025 ने झालेल्या निकालाप्रमाणे रस्त्याची नोंद इतर अधिकारात होणे बाबत मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/555/2026 व शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/ प्र.क्र 47/ज -1 अ/मुंबई दि. 22 मे. 2025 अन्वये सदर गटाच्या इतर अधिकारात अर्जदार बाळासाहेब गेणु रेवाळे, प्रकाश गेणु रेवाळे ,द्वारकाबाई प्रकाश रेवाळे, अरुणाबाई काशिनाथ पवार यांच्या मालकीचे गट गट नं 16/1,16/2 व 16/3/1 आहेत. गट नं 16 चे लगत दक्षिणेस गट नं 17/1/1 व गट नं 17/1/3 व गट नं 17/1/4 या गट नं 17 मधील अर्जदार पोपट किसन पवार, कांतीलाल पोपट पवार यांच्या मालकीचे आहेत. वांजूळपोई गावातून के टी वेअरकडे जाणारा खडीकरण रस्ता आहे.सदर रस्त्यापासून गट नं 19 व गट नं 20 च्या बांधावरून गट नं 16 व 17 जमिनीत जाण्यासाठी जुना गाडी रस्ता आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी 5 फुट रुंदीची जागा रस्त्यासाठी सोडलेली आहे. अशी नोंद केली असे. नोंद मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन 2/555 /2026 दिनांक 13/72026 वरून. सदर नोंद पूर्वी फेरफार नं 4078 ने घेतली होती. परंतु सदर रस्त्याच्या नोंदीचा अंमल गट नं 19, 16/1, 16/2 16/3/1, 17/1/1, 17/1/3 व 17/1/4 या गटावर न घेतल्याने या फेरफार नंबर ने फेर नोंद घेतली असे.