Ferfar #2843 · पळसपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
पारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 154/2024 हुकुमनामा तसेच
तहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कवि/कु.का/ 117/2025 पारनेर दिनांक 25/09/2025 नुसार
नोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र 401/2026 दिनांक 15/10/2026
वादी.
बाळासाहेब भिमाजी काकडे वय ६२ वर्षे, धंदा शेती.
प्रतिवादी.
१) लहु भिमाजी काकडे वय ५८ वर्षे, धंदा शेती,
२) सुरेश भिमाजी काकडे वय ५६ वर्षे, धंदा शेती,
३) भामाबाई रावसाहेब लामखडे वय ७४ वर्षे, धंदा शेती,
४) कुसुम दादाभाऊ गाजरेवय ६० वर्षे, धंदा शेती,
सर्व रा . पळसपुर , ता. पारनेर,हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे
मौजे पळसपुर येथील गट नंबर १४९
वादी बाळासाहेब भिमाजी काकडे यांना पूर्व-पश्चिम लांबीचे पश्चिम कोपऱ्यातील उत्तरेकडील ०. ६१.७९ हे आर क्षेत्र तसेच पूर्व पश्चिम लांबीचे पूर्व कोपऱ्यातील उत्तरेकडील ०. १८.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले आहे .
प्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे यांना पूर्व पश्चिम लांबीचे दक्षिणेकडील २ हे ३७.१२ आर क्षेत्र तसेच पूर्व-पश्चिम लांबीचे वादी बाळासाहेब यांचे लगत दक्षिणेकडील ० .१५.०० हे आर क्षेत्र वाटपान देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना पूर्व-पश्चिम लांबीचे पूर्व-दक्षिण कोपऱ्यातील ० . ४८.५१ हे आर क्षेत्र तसेच पूर्व-पश्चिम लांबीचे प्रतिवादी नं १ लहु यांचे लगत दक्षिणेकडील ०.१५.०० हे आर क्षेत्र वाटपान देण्यात आलेले आहे.
वादी बाळासाहेब भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना ० है ०२.०० आर खराबा क्षेत्र सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर १२५
सदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ०१.०० आर क्षेत्र वादी बाळासाहेब भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.
सदर दाव्यातील प्रतिवादी नं.३ भामाबाई रावसाहेब लामखडे व प्रतिवादी नं ४ कुसुम दादाभाऊ गाजरे यांनी त्यांचा दावा मिळकतोमधील असलेला संपूर्ण हक्क व हिस्सा हा कायम स्वरुपी वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांचेकरीता सोडून दिलेला आहे. त्यांना दावा मिळकतीमध्ये काहीएक मागणं नाही.
सदर दाव्यातील गट नं. १४९ मधील एक स्वतंत्र चालु पाण्याची विहिर तसेच त्यामधील इले. मोटार व पाईपलाईन व पाणी घेण्याचा हिस्सा हा वादी व प्रतिवादी नं १ व २ यांचेत सामाईकात ठेवण्यात आलेला आहे.
सदर दाव्यातील गट नं. १४९ मध्ये वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांना वहिवाट करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी सामाईकात रस्ता ठेवण्यात आलेला असून त्यास वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांनी एकमेकांस हरकत अडथळा करावयाचा नाही.
सदरचे सुलेनाम्यावरुन होणारे हुकमनाम्याचे आधारे गांव दप्तरी ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईट्सला आपसांत नोंदी करणेकामी वादी, प्रतिवादी यांनी एकमेकांना संपूर्ण संमती दिलेली आहे.
येणेप्रमाने हुकुमनामा असे.
आदेशावरून नोंद.