Ferfar #7942 · भानगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- सुहास श्रीपती साळवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
खरेदी देणार – शांता शहाजी महाडीक
खरेदी घेणार- बाजीराव सोनबा महाडीक
खरेदीखत मौजे भानगाव येथील शेतजमीन गट नं. 263 क्षेत्र2 हे.77 आर वहिती व खराबा 0 हे.03 आर एकुण 2 है.80 आर आकार 5 रु.62 पैसे यात लिहून देणार यांचे 0 हे.70 आर वहिती क्षेत्र असून सदर क्षेत्रामध्ये लिहून देणार यांची एक चालु पाण्याची विहीर आहे ती व तीच्या मधील पाण्यात लिहून घेणार यांना आठ आणे (निम्मा) हिस्सा कायम खरेदी दिला आहे मात्र जमीन खरेदी दिली नाही तसेच सदर विहीरीवर एक 5 एच.पी.ची इले. मोटार, इले. कनेक्शन व पाईपलाईन आहे त्यात आट आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच यात एक स्वतंत्र बोअरवेल आहे त्यात आठ आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच सदर बोअरवेलवर 3/20 चा सबमर्शिबल पंप आहे त्यात आठ आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच सदर ग.नं. 263 मधुन पुर्व-पश्चिम उत्तर बाजुचे बांधाचे आतुन 12 फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार यांचे ग.नं.261 मध्ये जाणे-येणेसाठी समाईक गाडी रस्ता ठेवला आहे त्याचे वहीवाटीचे हक्कासह .दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5802 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 150000.00 घेउन खरेदी दिली.
सूची क्रमांक 2 नुसार नोंद केली .