सातबारा Watch

← वारणी

Ferfar #3792 · वारणी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1081
Talathi
सय्यद मोहम्मद खिजर उस्ताद
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 नुसार मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे. नोंद हुकूमनामा :- अर्जदार बाळासाहेब रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार जि. बीड यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे न्यायालयातील आर. सी. एस. नं. ४२४/२०२३ ची नक्कल दाखल केलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. वादी :- राजेंद्र रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार प्रतिवादी :- १. सुमनबाई रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार २. बाळू उर्फ बाळासाहेब रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार ३. चंद्रकांत रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार वरील वादी व प्रतिवादी यांचे मध्ये मौजे वारणी ता. शिरूर कासार जि. बीड येथील जमिनीचा पुढीलप्रमाणे हुकूमनामा झालेला आहे. मौजे वारणी येथील जमीन गट नं. १०८१ मधील रावसाहेब भुजंगराव बडे मयत असून वादि व प्रतिवादी क्र. २ व ३ हे मयत व्यक्तींची मुले असून प्रतिवादी क्रमांक १ हि मयताची पत्नी आहे. मयत रावसाहेब भुजंगराव बडे यांचे नावे असणारी जमीन पुढीलप्रमाणे वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे. १. प्रतिवादी क्रमांक २ बाळू उर्फ बाळासाहेब रावसाहेब बडे यांना जमीन गट नं. १०८१ मधील ०.३४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे. २. प्रतिवादी क्र. ३ चंद्रकांत रावसाहेब बडे यांना जमीन गट नं. १०८१ मधील ०.२३०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे तडजोडपत्र हे वादी व प्रतिवादी यांचेत झालेले आहे. उपरोक्त मिळकत हि वादी व प्रतिवादी यांची हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत असून वादी व प्रतिवादी हे कुटुंबातील सदस्य आहेत. करिता अर्जदार यांचा अर्ज व मा. न्यायालयाच्या हुकूमनामा आधारे नोंद घेण्यात आली. ती निर्णयास्तव सादर. टीप : सह जिल्हा निबंधक वर्ग १ बीड यांचे चलन क्रमांक MH०११३५४६८३२०२६२७M नुसार मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.