सातबारा Watch

← भोगलगांव

Ferfar #2431 · भोगलगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
भरत नारायण टकले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/07/2025 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.50/2025 आदेश दिनांक : 28/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. 50/2025 दि 28/07/2025 प्रमाणे वादी :-1) मालनबाई नारायण लिंबुरे विरुद्ध प्रतिवादी :-1) बबन नारायण लिंबुरे 2) कैलास नारायण लिंबुरे 3) मिराबाई कृष्णा घुंगासे 4) छाया बंडु बनगे कोर्ट डिग्री करण्याचे कारण की वादी ही प्रतिवादी क्र.1 ते 4 यांची जन्मदाती आई आहे वादीचे पती व प्रतिवादी क्र.1ते 4 यांची वडील नामे नारायण मोहन लिंबुरे हे 19/09/ 2021 मयत झाले आहे. प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे वादी यांचे मुले असून व प्रतिवादी क्र 3 व 4 मुली असून प्रतिवादी क्र.1 व 2 यांच्या बहिणी आहेत सदर वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मनाने वाटप करण्याचे प्रयोजन. वादग्रस्त क्षेत्र तडजोड पूर्वी क्षेत्र :- 1 हे 10 आर पो.ख 0.02 आर तडजोड पश्चात क्षेत्र:- वादी मालनबाई नारायण लिंबुरे सर्वे नंबर 154 मधील 1. 10 हे आर पो.ख. 0.02 आर यांना संपूर्ण जमीन दिली. प्रतिवादी क्र. 1,2, यांनी सदर मिळकती मधील त्यांचा असणारा हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी व प्रतिवादी क्र.3 व 4 त्या विवाहित असून सासरी सुखा समाधान नांदत आहे म्हणून त्यांनी नमूद मिळकती मधील त्यांचा हक्क व अधिकार हिस्सा वादी यांच्या हक्कात कायम स्वरूपी विना मोबदला सोडून दिला आहे . हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. करिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा.नं. 50/2025 दिनांक 28/07/2025 व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चलन क्रमांक MH009835452202627Mआणि MH009835204202627M दिनांक 08/09/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.