सातबारा Watch

← सिंदखेड

Ferfar #1569 · सिंदखेड

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
216, 229
Talathi
वैशाली गणेश आत्राम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. 2025/कुळ/कावि/293 आदेश दिनांक : 05/08/2026 अर्जदार प्रदिप वसंत रामदासी यांचा अर्ज प्राप्त दि. 30/10/2026 व मा. तहसीलदार, गेवराई यांचे न्यायालयीन आदेश प्रकरण क्र. 2025/कुळ/कावि/293, विषय मौजे सिंदखेड येथील गट क्र. 216 व 229 च्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील कुळाची नोंद कमी करणेबाबत, मा. तहसीलदार यांनी दि. 05/08/2026 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये,मा. तहसीलदार गेवराई यांना दि. 03/08/2026 रोजी पक्षकारांनी दाखल केलेल्या तडजोडपत्रानुसार, सदर गटांच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील अर्जदाराची नावाची कुळाची नोंद कमी करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यानुसार सदर आदेशाची अंमलबजावणी म्हणून मौ.सिंदखेड येथील जमीन गट क्र. 216 व 229 या शेत जमिनीच्या7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरात नोंद असलेली अर्जदार यांच्या नावाची कुळाची नोंद कमी करण्यासाठी वरील दस्ताप्रमाणे सदर नोंद घेण्यात येत आहे. करीता ती नोंद अवलोकनार्थ तथा पुढील निर्णयास्तव सविनय सादर.