सातबारा Watch

← उक्कडपींपरी

Ferfar #1355 · उक्कडपींपरी

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132, 133, 80
Talathi
नितेश गजानन खिल्लारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 553/2026 आदेश दिनांक : 29/08/2026 वादी- सुखदेव बाबुराव पवार रा.उक्कडपिंपरी ता. गेवराई जि.बीड प्रतिवादी- 1) बाबुराव देवराव पवार रा. उक्कडपिंपरी ता. गेवराई जि.बीड 2)महादेव बाबुराव पवार रा. उक्कडपिंपरी ता.गेवराई जि.बीड यांचे मध्‍ये मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं.553/2026 ने वाद चालु होता सदर दाव्यात दिनांक 29/08/2026 रोजी तडजोड होऊन सरस निरस प्रमाणे जमीन वाटप करुन घेतल्या. सदरील वादग्रस्त क्षेत्र हे मौजे उक्कडपिंपरी येथे वादी व प्रतिवादी क्र. 2 च्या नावे वेळोवेळी एकत्रितरित्या वेगवेगळ्या खरेदीखता आधारे घेतलेल्या आहेत. ते पुढील प्रमाणे वाटप करून घेतल्या. वादी नामे सुखदेव बाबुराव पवार यांना सर्वे /गट नं. 132 मध्ये 1 हे 73 आर व पो.ख. 0 हे 03 आर क्षेत्र तसेच सर्वे नं./गट नं. 133 मध्ये 0 हे 83.50 आर व पो.ख. 0 हे 02 आर तसेच प्रतिवादी क्र. 02 महादेव बाबुराव पवार यांना सर्वे नं./गट नं. 80 मध्ये 0 हे 58 आर व पो.ख.0 हे 03 आर वाटप करून दिले. असे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी क्र. 1 यांनी सदरील वादग्रस्त मिळकतीमधील हिस्सा त्यांनी प्रतिवादी क्र. 2 यांच्या हक्कात सोडून दिला. या प्रमाणे तडजोड झाली. मे.दिवानी न्यायाधिश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयाची रे.दि.दा.नं. 553/2026 दिनांक 29/08/2026 रोजीची छायांकित प्रत व चलन क्र.MH12312759202627M रु.39950/- व MH012312920202627M रु. 100 आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.