Ferfar #2302 · रेवली
परळी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- सचिन कुंडलिकराव साबळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 184/2025
आदेश दिनांक : 08/10/2025
मा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, परळी वैजनाथ, जि. बीड यांच्या न्यायालयातील दिवाणी दावा क्र. 184/2025 मध्ये दिनांक 18/06/2025 रोजी झालेल्या तडजोडीच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये जमीन वाटपाबाबत तडजोड झाली आहे.
वादी व प्रतिवादी हे एकाच हिंदू कुटुंबातील सदस्य असून, मौजे रेवती, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथील गट क्रमांक 143 मधील एकूण क्षेत्र 00 हे. 57 आर जमीन त्यांच्या संयुक्त / सामाईक नावाने महसूल अभिलेखात नोंद आहे.
सदर जमिनीपैकी वादी ज्ञानेश्वरी गोविंद मुंडे यांना क्षेत्र 00 हे. 28.50 आर जमीन देण्यात आलेली असून, उर्वरित क्षेत्र 00 हे. 28.50 आर जमीन प्रतिवादी क्र. 2 मंदाकिनी व्यंकटी कराड यांना देण्याचे तडजोडीत मान्य करण्यात आले आहे. तसेच गंगाबाई बब्रुवान कांदे यांनी सदर जमिनीचे हक्क सोडून दिले आहेत.
त्याअनुषंगाने मा. न्यायालयातील तडजोडीच्या आदेशानुसार व डिक्रीनुसार मौजे रेवती, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथील गट क्र. 143 मधील वादी व प्रतिवादी यांच्या हिश्श्याप्रमाणे क्षेत्राची विभागणी करून संबंधितांच्या नावे स्वतंत्र हक्क नोंद करण्यासाठी सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे. ती मंजुरीस्तव सेवेत सादर.