सातबारा Watch

← शेकापूर

Ferfar #1742 · शेकापूर

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
मजहरअली बशिरअली सय्यद
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंदीचा प्रकार - कोर्ट डिक्री - अर्जदार नारायण राजाराम चोपडे रा. शेकापूर ता. उदगीर जि. लातूर यांनी अर्जासोबत कोर्ट डिक्री क्र. 489 /2025 ची नक्‍कल देऊन विनंती केल्‍यावरून नोंद घेण्‍यात आली. मा. दिवाणी न्यायालय (क.स्‍तर ) उदगीर यांचे न्यायालयातील दिवाणी दावा क्र. 489/2025 आदेश दिनांक 06/01/2026 मध्‍ये वादी व प्रतिवादी यांनी मौजे शेकापूर येथील जमीन गट क्र.17 व 19 मधील जमीन खालीलप्रमाणे तडजोडपत्र करुन वाटणी करुन घेतली आहे. 1)वादी नारायण राजाराम चोपडे यांचे हिस्‍सेस गट क्र. 17 मधील क्षेत्र 0.53 हे.आर( पोटखराबसह) जमीन वाटणीस आली आहे. 2)प्रतिवादी क्र. 1 श्रीरंग राजाराम चोपडे यांचे हिस्‍सेस गट क्र. 19 मधील क्षेत्र 0.45 हे. आर जमीन वाटणी हिस्‍सेस आली आहे. प्रतिवादी क्र. 3/1 ते 3/4 यांनी त्‍यांचा सदर गट क्र.17 व 19 मधील त्‍यांचा कायदेशीर हिस्‍सा वादी व प्रतिवादी क्र. 1 यांच्‍या हक्‍कात नैसर्गीक प्रेमाखातर सोडून दिला आहे. प्रतिवादी क्र. 2 सुमनबाई राजाराम चोपडे हिस वादी व प्रतिवादी क्र.1 यांनी प्रत्‍येक महिन्‍याला प्रत्‍येकी 800/रु. असे दोघांचे मिळून 1600/ रु. देण्‍याचे ठरले आहे. तसेच वादी नारायण राजाराम चोपडे यांनी सदर कोर्ट डिक्रीचा दस्‍त मा.सह जिल्‍हा निबंधक व मुद्रांक जिल्‍हाधि‍कारी वर्ग-1 (नि.श्रेणी)लातूर येथे मुद्रांक शुल्‍क भरुन योग्‍य मुद्रांकित करणेत आलेला आहे. तरी सदर कोर्ट डिक्री आधारे नोंद सेवेत सादर.