Ferfar #5142 · गोंदवले खुर्द
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
ग्रामपंचायत हद्दीतील मौजे गोंदवले खुर्द येथील खालीलप्रमाणे गट नंबरमधील खातेदार श्रीमती बनुबाई श्रीराम पोळ (रा. गोंदवले खुर्द) या दिनांक 19/09/2024 रोजी मयत झाल्या आहेत.
त्यांनी हयात असताना दिनांक ०६/१०/२०२० रोजी नॉटरी नोंदणी क्र.३४६/२०२० अन्वये आपले स्वखुशीने व अक्कलहुशारीने मृत्युपत्र निष्पादित करून ठेवलेले आहे. सदर मृत्युपत्रानुसार त्यांनी त्यांच्या मालकीचा व अधिकाराचा खालील नमूद गट क्रमांकांमधील कायदेशीर चतुर्थांश (१/४) हिस्सा त्यांचे नातू १) श्री. प्रसाद जगन्नाथ पोळ व २) श्री. अमोल जगन्नाथ पोळ (दोघे रा. गोंदवले खुर्द) यांच्या नावे मृत्युपत्राद्वारे दिला आहे.
मिळकतीचा तपशील गट क्र: ११०९ ,११२८,११५४,४३४/१ ,१०४५
त्याअर्थी, मयत बनुबाई श्रीराम पोळ यांच्या मृत्यू दाखल्यावरून व दिनांक ०६/१०/२०२० च्या मृत्युपत्रानुसार, वरील सर्व गट क्रमांकांमधील मयत बनुबाई श्रीराम पोळ यांचे नाव कमी करून, त्यांचे हक्काचे हिस्से व क्षेत्र मृत्युपत्रधारक नातू १) श्री. प्रसाद जगन्नाथ पोळ व २) श्री. अमोल जगन्नाथ पोळ यांच्या नावे प्रत्येकी समान/कायदेशीर हिश्शाने फेरफार नोंद करण्यात येत आहे. कागदपत्र मृत्युपत्र अर्ज आर टीएस फाईलीस दाखल असे