Ferfar #12452 · मायणी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. पुनर्व/न.शर्त/एसआर-85/2026
आदेश दिनांक : 06/07/2026
मा. तहसिलदार, खटाव (वडूज) यांच्या आदेश क्र. पुनर्व/न.शर्त/एसआर-85/2026, दिनांक 06/07/2026 अन्वये नोंद घेण्यात येते की,
मौजे मायणी, ता. खटाव येथील गट क्र. 2279/6 (क्षेत्र 0.40.00 हे.आर.) ही जमीन तारळी प्रकल्पग्रस्त खातेदार शिवाजी शामराव थोरात वगैरे यांचे वडील श्री. शामराव आबाजी थोरात यांच्या नावे मा. उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, कराड यांच्या आदेश क्र. पुनर्व/तारळी/निवडे/कावि-185/11, दि. 28/03/2011 अन्वये वाटप झालेली आहे.
सदर जमिनीवरील पुनर्वसनांतर्गत कब्जेहक्काची 10% भूसंपादन खर्च व 12% व्याजाची रक्कम रु. 1,14,839/- (अक्षरी: एक लाख चौदा हजार आठशे एकोनचाळीस रुपये फक्त) अर्जदार श्री. शिवाजी शामराव थोरात वगैरे यांनी चलनाद्वारे स्टेट बैंक वडूज येथे दि. 03/07/2026 रोजी भरलेली आहे.
त्यानुसार मा. तहसिलदार खटाव यांच्या आदेशानुसार, सदर गट क्र. 2279/6 च्या 7/12 पत्रकातील इतर हक्कात असलेला "पुनर्वसनांतर्गत कब्जेहक्काची रक्कम वसूल करणे" हा दाखल असलेला शेरा कमी करण्यात आला असे. आदेश दप्तरी दाखल असे.